आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
Mots clés life inspirational art hobbies marathi
कुणीसं म्हटलयं - कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!... खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.
P.L. DeshpandeMots clés marathi asa-me-asaami
जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!
P.L. DeshpandePage 1 de 1.
Data privacy
Imprint
Contact
Diese Website verwendet Cookies, um Ihnen die bestmögliche Funktionalität bieten zu können.