साधेपणा किती उदात्त असू शकतो , हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. राहतील. हिंदू लोक काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. न हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.
Autore: Bhalchandra Nemade